Kadhi Na Tula
कधी ना तुला
का अशी हुरहुर लावुनी जीवा
गोफ हा मन विणू लागते नवा
कुणीतरी नकळत साद घालते
हरपुनी अवचित जीव लावते
किती समजावले
किती हुलकावले
तरीही जुळले पुन्हा
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते
कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते
कधी न तुला
अंतरा
अलगद जे रुणझुणत राही आत जे
अनवटसे मज कळत नाही काय ते
गहिरी ही भूल आहे जरा
तरी वाटे सूर आहे खरा
नवखे जग हे आज मलाor
जगणे कळले आज नव्याने
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते
कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते
कधी न तुला




























































































































































































