www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

पंचक – Panchak Title Song

चमत्कार तुला तुझं कळू आलं – Chamatkar

Panchak Title Song

पंचक Title Song

एकं द्वितीय तृतीय चतुर्थ पंचक
पंचक पंचक पंचक पंचक पंचक
पंचक पंचक पंचक…(२)

उपाय केले किती नी काही
मरण कुणाला चुकले नाही (२)…
अशक्य आहे शंभर टक्के
यमराजाला कलटी देणे संभव
आऊ…
भ भा भि भी भु भू भे भै भौ भौ
अन् भितीची बाराखडी आठवली

भिषण भलती भयाण भिती
येऊन बसते नरड्यावरती (२)…
असत्या नसत्या हजार शंका
छाताडावर नाचून जाती
हो काळ कावळा उगाच हसतो
विचार करूनी मेंदू झिजतो
अन् शक्य नाही शंभर टक्के
यमराजाला कलटी देणे संभव
आऊ…
भ भा भि भी भु भू भे भै भौ भौ
अन् भितीची बाराखडी आठवली (२)

Panchak Panchak

Panchak Panchak

भीषण भलती भयाण भिती
येऊन बसते नरड्यावरती
असत्या नसत्या हजार शंका
छाताडावर नाचून जाती
काळ कावळा उगाच हसतो
विचार करुनी मेंदू झिजतो
आणि भयाचा भुंगा बसतो
मस्तका मधे मारुन बैठक
पंचक पंचक पंचक पंचक
पंचक पंचक पंचक पंचक

भिती डुचकी भारी चेंगट
होउन बसते नसते झेंगट
काळजामधे दुप्पट असते
मानगुटीवर होते चौपट
मस्तका मधे मारुन बैठक
अखंड भुंगा लावून जातो
म्हणे यमाचा रेडा येतो
दारामधे होवून याचक
पंचक पंचक पंचक पंचक
पंचक पंचक पंचक पंचक

Chamatkar - Tula Tuza Kalu Aala

चमत्कार – तुझं तुला कळू आलं

अंधाराला उजेडाचं सापडूदे दार रे
तुझं तुला कळू आलं तोच चमत्कार रे

ज्याला त्याला उमगते
ज्याची त्याची भाषा
बाकी इथे जगण्याचा
रोजचा तमाशा
टिचभर निराशेचा सोसवेना भार रे
गाव तोच मुक्कामाचा परी वाटा चार रे
उमगावं ज्याला त्याला जगण्याचं सार रे
तुझं तुला कळू आलं तोच चमत्कार रे

जशी ज्याची जाण आहे
तसा देव त्याचा
जोतो ईथे सावरुन
तोल जगण्याचा
बडवितो दिनरात नशिबाचं दार रे
मिळेलत्या आकारात शोधतो आधार रे
उमगावं ज्याला त्याला जगण्याचं सार रे
तुझं तुला कळू आलं तोच चमत्कार रे

अंधाराला उजेडाचं सापडूदे दार रे
उमगावं ज्याला त्याला जगण्याचं सार रे
तुझं तुला कळू आलं तोच चमत्कार रे

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top