Tuzya Sobatiche
तुझ्या सोबतीचे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळी ला जसे चांदणे
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे मनाशी किती बोलणे
निराळीच काही तुझी भूल आहे
धुके प्यायल्या रानवाटा जशा
जसे गुंफले सांजवाऱ्या मधूनी
जुई मोगऱ्याचेही गंधाळणे
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे मनाशी किती बोलणे
कसे कोण जाणे उमगलेच नाही
शहारुन आल्या अशा जाणिवा
नव्याशा हव्याशा अशा वागण्याची
मला मीच द्यावी किती कारणे
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे मनाशी किती बोलणे




























































































































































































