Umgaya Baap Ra
उमगाया बाप रं
उरा मंदी माया त्याच्या
काळ्या मेघावानी
दाखवीना कधी कुना
डोळ्यातलं पानी
झिजू झिजू संसाराचा
गाडा हाकला
व्हटामंदी हासू जरी
कना वाकला
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं
अंतरा – १
मुकी मुकी माया त्याची मुकी घालमेल
लेकराच्या पायी उभा जल्म ऊधळेल
आधाराचा वड जनू वाकलं आभाळ
पाचोळाच तेच्या इना जल्म रानोमाळ
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं
अंतरा – २
किती जरी लावले तू आभाळाला हात
चिंता तुझी मुक्कामाला तेच्या काळजात
वाच तेच्या डोळ्यातली कधी कासावीशी
तुझ्यापाई राबनं बी होती त्याची खुशी
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप