www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Dil Hareya Oye

Marathi Matichaa

Man Rahile Naahi Haati

हून लगन लगी की करीये
ना जी सकीये ना मरीये

तुम सुनो हमारी बैना
ना दिन कटे ना ही रैना

हून पी बिन पलक ना सरीये
अब लगन लगी की करीये ?

ना जी सकीये ना मरीये

न कळे कधी मन गुंतले
अन गुंतले हात हाती
रोकू कसे मी स्वतःला
मन राहिले नाही हाती

तोडून बंध होवून धुंद
वेडी मने साद देती
रोकू कसे मी स्वतःला
मन राहिले नाही हाती
न कळे कधी मन गुंतले
मन गुंतले

हो रब्बा हो

किती रोखले किती बांधले
कितीदा तरी समजावले
धूडकावूनी ही बंधने
तुज भेटण्या मी धावले
मी धावले… मी धावले

येता जुळून रेशीम बंध
जुळती नवीन ही नाती
रोकू कसे मी स्वतःला
मन राहिले नाही हाती
न कळे कधी मन गुंतले….
मन गुंतले….

हो रब्बा हो

आतुरल्या डोळ्यातले
बघ सांगती घन दाटले
चालावया संगे तुझ्या
नादावली ही पाऊले
ही पाऊले…ही पाऊले

घे सावरून बघ मोहरून
आले इथे तुझ्यासाठी
रोकू कसे मी स्वतःला
मन राहिले नाही हाती
न कळे कधी मन गुंतले….
मन गुंतले….

हून लगन लगी की करीये
ना जी सकीये ना मरीये

Avkhalase sparsh

अवखळसे स्पर्श ते हरवले का असे
तु मला सांगना सांगना..
दरवळती भोवती भास सारे तुझे का असे
सांगना सांगना सांगना..
गुरफटला जीव हा सोडवू मी कसा
तू मला सांग ना सांगना

चालता चालता हरवली सावली
पावले गुंतता वाट भांबावली
साद देती तरी का तुझ्या चाहुली
तू मला सांग ना सांगना….
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे
तु मला सांगना सांगना..

आठवांचे तुझ्या चालती सोहळे
रोखले मी जरी पापणी ओघळे
सावरु ह्या मना मी कसे या क्षणी
तू मला सांग ना सांगना…
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे
तु मला सांगना सांगना..

गीत – गुरु ठाकूर
संगीत – नीलेश मोहरीर
गायक – स्वप्निल बांदोडकर व जानवी अरोरा

Dil Hareya Oye

सोयी सोयी सुबहा्मे जग्गी पलकांते
खोये खोये ख्वाब जो दिल्को महकाते
लुट्टे लुट्टॆ होश ते बहकी मनकी गलीयां ओये
दिल हरेया ओये…

जाये जीस ओर करे मिठा मिठा शोर
चले इसपे ना जोर किसी का
जीस पे ये आये,उसे भुला नही पाये
होके रह जाये उसीका..
धुन मे अपनी गुनगुनाये
होके रसिया ओये..
दिल हरेया ओये…

सपनोंके पार लेके जाये बारबार
हौले हौले छेडे तार तार मनके
करे मिठी मिठी बात भरे आहें रात रात
कभी आंसू बनके अखियोंसे छलके
होके छलीया ओये…
दिल हरेया ओये…

गीत – गुरु ठाकूर
संगीत – नीलेश मोहरीर
गायक- जानवी अरोरा

Marathi Matichaa

बोलतो जिथे चौघडा….
हलकी तडतडा….
रांगडा गडी जिथे बेभान..
हरपुनी जाई तयाचे भान….
फुलुनी ये छाती….
उभारे मान…
मराठी मातीचा अभिमान…!!!!!!!!!

मातीने दिला त्या होश….
मनगटी जोश…
उसळते झिंग अशी धमन्यात…
ठसका मिरचीचा जसा खर्ड्यात ….
नका शिरू आमच्या आड्व्यात…आमच्या आड्व्यात..
पाणी आणेल गडी डोळ्यात जी….जी जी

परी नार इथली गुलजार असे गुलजार…
नेसुनी नवी नऊवार नवी नऊवार…
करितसे सोळा शिणगार सोळा शिणगार…
नाथ वाकी कुड्या नि बिलवर कुड्या नि बिलवर…
रेखिते कोर चंद्राची कपाळावर…
लखलखती जणू तलवार दिसे तलवार…
दडवली कस्तुरी हि पदरात जी…जी..जी.जी…जी…जी..!!!!

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top