बहरला हा मधुमास
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली, साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
तू नार, सखे, सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तू सांग कसा विझणार? हे जी!
तू सांग कसा विझणार?
उरीचा धगधगता वणवा
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
किती वसंत मनात उमलुन आले
आणिक दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
वाजती पैंजनेही मुक्या स्पंदनी
दाटते प्रीत ह्या गुंतल्या लोचनी
ही साद तुझ्या हृदयाची
हलकीच उरी प्रणयाची
हुरहूर मनी मिलनाची, हे जी!
हुरहूर मनी मिलनाची
दे सखे, कौल आता उजवा
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली रे
सुखाला साज नवा चढला
गाऊ नको किसना
घागरी फोडून जातुया
दही-दूध चोरून खातुया
यसोदे आवर त्याला
घोर जीवाला फार
ग्वाड लय बोलून छळतोया
द्वाड लय छेडून पळतोया
सावळा पोरं तुझा हा
रोज करी बेजार
त्याला समजावून झालं
कैकदा कावून झालं
तुझी नाही धडकत आता
इकडं राहू नको
ए, गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
सये, पाखरू रानाचं देतंया संगावा
वाट माहेराची साद घालते
सये, दाटते-दाटते पंचमी सणाला
गंगा-यमुना गं डोळी नाचते
नागपंचमीचा आला सण
पुन्याईचं मागू धन
किरपा तूझी आम्हावर राहू दे
आज वाण हिरव्या चुड्यानं
कुकवाचं मागू लेण
औक्ष धन्या लेकराला लागू दे
दृष्ट ना लागो कुणाची
ऱ्हाऊ दे साथ सुखाची
ए, आड बाजुला लप जा
तोंड बी दावू नको
ए, गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गोकुळात रंग खेळतो
रंग खेळतो श्रीहरी
गोकुळात रंग खेळतो
रंग-रंग खेळतो श्रीहरी
गोकुळात रंग खेळतो
रंग खेळतो श्रीहरी
मोहनात दंग राधिका
दंग राधिका भाबडी
लावीतो लळा श्याम सावळा
लागला तुझा रंग हा निळा
सूर बासरीचा मोहवी मनाला
बासरीत या जीव गुंतला
सोडवू कसा रे सांग मोहना?
जीव-प्राण होऊन कान्हा
श्याम रंग लावून कान्हा
सोडून गोकुळ, कान्हा, जाऊ नको
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
अंबाबाई गोंधळाला ये
अगं, धाव आई, ठायी-ठायी दैत्य मातला
अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला
अगं, धाव आई, ठायी-ठायी दैत्य मातला
अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला
आता त्रिशुळ तू हातात आई घे
बळ तेच आज संबळाला दे
अन अंबाबाई गोंधळाला ये
अन अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अन काळुबाई गोंधळाला ये
हे सप्तशृंगवासिनी तुझा गोंधळ
(आईचा गोंधळ)
हे आई तुळजाभवानीचा गोंधळ
(आईचा गोंधळ)
अगं माहूरगडवासिनी तुझा गोंधळ
(आईचा गोंधळ)
आई करवीरवासिनी तुझा गोंधळ
(आईचा गोंधळ)
ए, वाघावर बैसूनी अंबा आली गं गोंधळाला
ए, साद ऐकून माझी अंबा आली गं गोंधळाला
ए, भक्तीचा आवाज चढविला गं साज
आज संबळ वाजं माझ्या आईच्या गोंधळाला
आता सरू दे अवस, करितो नवस, गोंधळाला ये
तुझा करितो गजर, राहू दे नजर, गोंधळाला ये
चोळी-बांगडी वाहीन, गोडवा गाईन, गोंधळाला ये
आई सुखाचा सागर, मायेचा पाझर, गोंधळाला ये
प्रलयातुनी जगा…
प्रलयातुनी जगा आई तूच तारिले
बळ तेच आज संबळाला दे
अंबाबाई गोंधळाला ये
अगं, अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं, काळुबाई गोंधळाला ये
ए, रात सरली काळी गं
(ए, उजळलं आभाळी गं)
उभी पाठीशी जगदंबा
(माझी माय लेकुरवाळी गं)
आई संकटातून तार, तुझे उघडुनी ये दार
आई गोंधळाला येना तुझा मांडला दरबार
तुझ्या दिवटीचा गं जाळ, झाला दुर्जनांचा काळ
आता तूच गं सांभाळ
आई गोंधळ मांडला, आज गोंधळाला ये
आई गोंधळाला, गोंधळाला, गोंधळाला ये
(आई गोंधळ मांडला, आज गोंधळाला ये)
(आई गोंधळाला, गोंधळाला, गोंधळाला ये)
अंगार जो तुझ्या…
अंगार जो तुझ्या नजरेत पेटला
अन तीच आग संबळाला दे
अगं, अंबाबाई गोंधळाला ये
Hey, अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं, काळुबाई गोंधळाला ये




























































































































































































