क्षण कालचे
मोकळा श्वास घे तुझा
शोध रे ध्यास तू नवा
विरुनी जाती रे
सरुनी जाती रे
क्षण कालचे
वेदना दूर राहू दे
वेदना दूर जाऊ दे
विरुनी जाती रे
सरुनी जाती रे
क्षण कालचे
विरुनी जाती रे
सरुनी जाती रे
क्षण कालचे
नवा ध्यास नवी आस रोज
जुना घाव जुना डाव सोड
आसवातुनही विजू दे
काळजा मधला वणवा
विरुनी जाती रे
सरुनी जाती रे
क्षण कालचे
मोकळा श्वास घे तुझा
होss शोध रे ध्यास तू नवा
तुझ्या तुला मिळो वाटा
ओंजळीत येऊ देत लाटा
संपू दे काळी रात रे
विरुनी जाती रे
सरुनी जाती रे
क्षण कालचे
होरी जाई रे
होरी जाई रे
दर्यांच्या लाटामन्दी हाई हई ए
झिंगलेल्या वाऱ्या संगती होरी जाई रे
होरी जाई रे
दर्यांच्या लाटामन्दी हाई हई ए
दर्यांच्या लाटामन्दी हाई हई ए
होरी जाई रे
सागर देवा रे हो दर्यांच्या राजा
सागर देवा रे हो दर्यांच्या राजा
होरी वरती माझ्या रे तुझी किरपा राहु दे
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
जोस आमचा आसमानी
जिद आमची तुफानी
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
दर्याच्या जाऊ पार हो
होरी जाई रे
दर्यांच्या लाटामन्दी हाई हई ए
झिंगलेल्या वाऱ्या संगती होरी जाई रे
आमी लाटे वरल्या फेसावानी रे
झिंगु वाऱ्यावर
आमची राजावानी जिंदगानी रे
नाई ताऱ्या वर
ये बस्तीचा अल्लड वारा
कालजात करतो पुकारा हो
शिनलेल्या डोल्या काठी
जमलाया माये चा किनारा हो
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
दर्याच्या जाऊ पार हो
होरी जाई रे
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
हैरी हुल्लारा हुल्लारा हुल्लाराली रे
होरी जाई रे
दर्यांच्या लाटामन्दी हाई हई ए
झिंगलेल्या वाऱ्या संगती होरी जाई रे
हळद वाजू दे
ये येरा पिसा झाला वारा झिंगला समिंदर
कवा कसा कंदी झाला दिलाचा मॅटर
लाटे वरी लाटा
नि अंगभर काटा
धाग्यामदी गुतला धागा गाठ बसू दे
हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे
हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे
ये हलदीच्या गो रंगानं कोलीवारा भिजू दे
हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे
हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे
घेतला मोका भीडला टाका
अन् कालजामदी घालमेल झाली
जाल्यामदी गावला मासा
अर् मासोलीबी गोरीमोरी झाली
लाडाची लेक सुखाने भिजू दे ग
ही नवराई सोन्या रुप्यात साजू दे ग
लेक उतावील भारी
ही फुटू दे सुपारी
धाग्यामदी गुतला धागा गाठ बसू दे
हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे
हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे




























































































































































































